Ad will apear here
Next
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग सात


आजच्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक आठ आणि नऊ अभ्यासणार आहोत. या ऋचा पुढीलप्रमाणे आहेत. 

क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥८॥

गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ।
ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियम् ॥ ९॥

श्रीसूक्ताला अनेक आयाम (Dimensions) आहेत. श्रीसूक्त हे केवळ धनाची पूर्तता करून, तुम्हाला फक्त गडगंज श्रीमंती देणार नसून, ते सर्वांत प्रथम धनधारक (Money holder) म्हणून तुमची लायकी, योग्यता आणि सिद्धता प्रदान करणारे स्तोत्र आहे. समाजात आपण अनेक विनोदी नवश्रीमंत लोक पहातो, ज्यांना अचानकपणे एखाद्या जमीनविक्रीतून वगैरे पैसा आलेला असतो, ती माणसं हाती आलेल्या पैशाचा अतोनात शो-ऑफ करतात, वाट्टेल तसा दोन्ही हातांनी पैसा उधळतात, अयोग्य ठिकाणी पैशाचा विनियोग करतात आणि सरतेशेवटी पैसा व्यसनात वगैरे घालवून संपवून टाकतात. पैशाच्या अनियोजनाचे जसे हे एक उदाहरण आहे, तसे दुसरे उदाहरण म्हणजे पैशाचा कंजूषपणा हेदेखील आहे. पैसा इतका जपून वापरायचा, की एकवेळ अर्धपोटी राहायचं; पण पैसा खर्च करायचा नाही. कपडालत्ता, हौसेमौजेच्या गोष्टीही खरेदी न करता, त्या पैशाचा शून्य उपभोग घेऊन तो पैसा फक्त तिजोरीत ठेवून देणारे महाभागही आपण बघतो. घरात गडगंज संपत्ती असूनही दारोदार भीक मागत फिरणारे लोकही आपण बघतो. या सगळ्याचा सुरेख सुवर्णमध्य गाठणे म्हणजे श्रीसूक्त होय.

आठव्या ऋचेचा अर्थ असा आहे, की ‘मी तहानभूक आणि अस्वच्छतारूपी अलक्ष्मीला माझ्या निवासस्थानातून बाहेर काढतो. तिचा त्याग करतो. हे लक्ष्मी, तू संकटे आणि अपयशाला माझ्या घरातून दूर हाकलून दे.’ इथे अलौकिक अर्थाने तहान-भुकेचा संबंध तृष्णा आणि लोभाशी लावलेला आहे. पैसा कमावण्यासाठी आपण दिवस-रात्र एक करतो; पण कधी तरी शांतपणे बसून त्या पैशाचा उपभोग आणि विनियोगही करायला हवा. कधी तरी आपले छंद जोपासायला हवेत, कधी तरी हौसेमौजेच्या चार गोष्टीही करायला हव्यात, कधी तरी कुटुंबाला वेळ द्यायला हवाय, कधी तरी सहल-पर्यटनही करायला हवंय, आवडीचे पदार्थ खायला हवेत... 

तृप्तता हे श्रीमंतीचे एक अविभाज्य लक्षण आहे हे तुम्ही लक्षात घ्या. अतृप्त आणि सतत वखवखल्याप्रमाणे पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसांना श्रीमंत म्हणता येत नाही... जिथे शांतता आहे, जिथे पैसा पैसा हा विषय नाही, जिथे रिलॅक्सेशन आहे, तिथे ऐश्वर्य आहे.... तिथे श्रीमंती आहे. अशा अतृप्त भावनेला माझ्या घरात मी थारा देत नाही.... त्या अलक्ष्मीचा मी त्याग करतो.... असा अर्थ तिथे अभिप्रेत आहे. 

या पुढच्या म्हणजे नवव्या ऋचेत श्रीमंतीचे वर्णन केले आहे. जिथे सुगंध आहे, जिथे सुशोभितता आहे, जिथे स्वच्छता आहे, तिथे जिचा मुक्काम असतो, त्या लक्ष्मी देवीला मी नमस्कार करतो. जिच्यावर आक्रमण करणे अशक्य आहे, जी सदैव श्रेष्ठ आहे, जी श्रीमंतीची स्पंदने निर्माण करते, जी समृद्ध आहे, अशा प्राणिमात्रांमध्ये वास करणाऱ्या व त्यांची स्वामिनी असलेल्या श्रीलक्ष्मीला मी नमस्कार करतो. श्रीसूक्ताची गंमत म्हणजे ते केवळ धनकारक नाही, हे मी मागे म्हणालेलो आहेच. तसंच ते एकाच वेळी धनसंपत्ती आणि सुसंस्कृततेचा एक अजोड संगमही आहे. श्रीमहालक्ष्मीपूजनात श्रीसूक्ताला म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत यासाठीच रोज संध्याकाळी चंदन, गुग्गुळ किंवा कोणत्याही सुगंधी धूपांनी... अत्तरविलेपनाने श्रीलक्ष्मीचे आवाहन, स्वागत करण्याची परंपरा सांगितलेली आहे. दुर्गंधी, अस्वच्छता, आळस, झोप यांचा जिला तिटकारा आहे, अशा सुगंधप्रिय, उत्साहवर्धन करणाऱ्या, सुस्वच्छप्रिय लक्ष्मीचे माझ्या घरी रोज आगमन होवो, जेणेकरून माझ्या निवासस्थानी तिचा सदैव सुखकर निवास होवो, अशी कामना श्रीसूक्तात केलेली आहे... 
(क्रमश:)

- सचिन मधुकर परांजपे (पालघर)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DXKNCP
Similar Posts
श्रीलक्ष्मीनारायणाष्टकम् मी आजवरच्या माझ्या अनेक लेखांमध्ये श्रीलक्ष्मी मातेची उपासना करण्याआधी भगवान श्री विष्णूंचे स्मरणचिंतन किंवा ध्यान करणे आवश्यक आहे हे सांगितले आहे. लक्ष्मीनारायण हे उभयतां एकमेकांपासून कधीच विभक्त मानले जात नाहीत. ते अद्वैतरूपी एकात्म साधून असतात. त्यातही श्री विष्णूंवर पत्नी श्री लक्ष्मीची अतीव प्रीती
श्रीसूक्त (ऋग्वेद) - भाग पाच लेखमालेच्या पाचव्या भागात आपण श्रीसूक्तातील ऋचा क्रमांक चार आणि पाच अभ्यासणार आहोत. श्रीसूक्त जसंजसं पुढे सरकत जातं, तसंतसं ते अधिकाधिक परिपक्व आणि स्तुती या अर्थाने परिपूर्ण होत जातं, असं आपल्या ध्यानात येईल. अगोदर आपण ऋचा आणि अर्थ बघून घेऊ या.
श्रीमहालक्ष्मी अप्रसन्न होण्याची मुख्य कारणे (भाग एक) महालक्ष्मी हे नेमकं काय तत्त्व आहे, त्याचं स्वरूप आणि कारणमीमांसा याबद्दल आपण आधीच्या लेखात पाहिले आहे. या लेखात पैशाच्या अभावाची मुख्य कारणे, पैसा न टिकण्याची कारणे किंवा आलेला पैसा जेमतेम एका पिढीपुरता टिकून पुढची पिढी कंगाल होण्यामागची कारणे यांचा ऊहापोह करू या... पालघर येथील ज्योतिष तज्ज्ञ सचिन मधुकर परांजपे यांचा लेख
श्री महालक्ष्मीचे गुणधर्म आपल्याला श्री महालक्ष्मीची प्राप्ती व्हावी, अर्थात धन, संपत्ती, सुबत्ता मिळावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते; पण ती प्राप्त होण्यासाठी काय करायला हवे आणि काय टाळायला हवे, याची जाणीव प्रत्येकाला असतेच असे नाही. पालघर येथील ज्योतिषतज्ज्ञ सचिन मधुकर परांजपे यांनी त्या विषयाबद्दल केलेले मार्गदर्शन काही लेखांमधून आपण पाहणार आहोत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language